Madhu Kambikar ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे दीर्घ आजाराने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे दीर्घ आजाराने सोमवारी पुण्यात निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 साली बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. त्याच्या करिअरची सुरुवात तमाशाच्या फडापासून झाली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मधू कांबीकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारल्या आहेत. ‘शापित’ या चित्रपटातील मधू कांबीकर यांच्या भूमिकेची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.

नृत्याचा कार्यक्रम सादर करताना आलेला पक्षाघाताचा झटका

मधू कांबीकर यांना 2016 साली मुंबईत नृत्याचा कार्यक्रम सादर करत असताना पक्षाघाताचा झटका आला होता. स्टेजवर येण्याआधीच त्यांना बरं वाटत नव्हतं तरी देखील त्यांनी प्रेक्षकांना नाराज न करता नृत्य सादर केले.