जेएनपीएत 50 हजार कंटेनर्ससाठी नवे यार्ड, माल हाताळण्याची क्षमता वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनपीएमध्ये 50 हजार कंटेनर्स उभे करण्यासाठी नवे यार्ड बांधले जात आहे. जागतिक दर्जाच्या सोयी असलेले हे यार्ड 62 एकर क्षेत्रात असून माल हाताळण्याची क्षमताही वाढणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी 2 हजार 580 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यार्ड उभारणीच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.

जेएनपीए बंदराच्या अगदी तीन किमी अंतरावर विकसित करण्यात येणाऱ्या एम्प्टी कंटेनर यार्ड पहिल्या टप्प्यात सुमारे 20 एकर क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम जानेवारी 2027 पर्यंत होणार असून त्यात 20 एकर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित काम पूर्ण केले जाईल.

स्वयंचलित यंत्रणा

रिकाम्या कंटेनर यार्डच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यार्ड मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे रिकाम्या कंटेनरच्या साठ्याची रिअल-टाइम दृश्यमानता समजणार आहे. मॅन्युअल डेटा एंट्री कमी करण्यासाठी सक्षम स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • गेट ऑपरेशन्स अंतर्गत चेकपॉइंट्सवर एकात्मिक क्युआर कोड
  • आरएफआयडी प्रणालींद्वारे सुरक्षित कंटेनर ट्रॅकिंग
  • ड्राय आणि फोल्डिंग कंटेनर्स हाताळण्याची सुविधा
  • कंटेनर हाताळणीसाठी कंटेनरची स्थिती आणि तपासणीसाठी
  • इन्स्पेक्शन बे व्यवस्था
  • यार्डमध्ये कार्यक्षम हालचालीसाठी अंतर्गत आणि परिसरात
  • अनेक रस्त्यांचे जाळे
  • वाहतूकदारांसाठी ट्रक पार्किंग सुविधा
  • भव्य प्रशासकीय इमारत