LIVE – इंडिया आघाडीचा एल्गार, देशभरातील खासदारांचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारची मनमानी आणि दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या देशभरातील खासदारांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आहे.

  • मोर्चाची बस आता मंडी हाऊसकडून कॅनॉट प्लसकडे रवाना
  • व्होट चोर गद्दी छोडच्या घोषणा
  • देशभरातील हजारो कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने
  • सर्वोच्च न्यायालयापासून 200 मीटर अंतरावर पोलिसांचे बॅरिकेटींग
  • मोर्चात वकिलांचा देखील मोर्चा मोठा सहभाग, अभिषेक मनू सिंघी देखील वकिलांसोबत हजर

  • सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
  • ममता बॅनर्जी, रेवंथ रेड्डी, सुप्रिया सुळे, तेजस्वी यादव, नाना पटोले देखील या मोर्चात सहभागी

  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत या आंदोलनात सहभागी

  • राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे बसमध्ये
  • ज्ञानेश कुमारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
  • इंडिया आघाडीचे सर्व खासदार बसमधून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने रवाना

  • देशभरातील इंडिया आघाडीचे खासदार, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सामील
  • सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा
  • इंडिया आघाडीच्या मोर्चाला बाराखंबा रोड जंक्शन येथून सुरुवात
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक