बावनकुळे साहेब, तुमच्या संपत्तीची चौकशी केली तर तुम्हाला…, हर्षवर्धन सपकाळांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना एक वक्तव्य केलं होतं. शिक्षकांना जो कुणी धमकी देईल त्यांना अजिबात सोडणार, त्यांच्यावर एसआयटी लावू असे त्यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

”बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल. विदेशात कोणत्या क्लब मध्ये जाऊन तुम्ही सुटकेस भरून कोट्यवधी रुपये लावून एका-दुरी खेळता. तो सर्व पैसा कुठून आला ते सांगा? असा सवाल देखील सपकाळ यांनी केला आहे.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारानिमित्त हर्षवर्धन सपकाळ हे अमरावती येथे आलेले असताना त्यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली.