देवगड आगाराची बस रस्त्यावरून खाली उतरली; मोठी दुर्घटना टळली

देवगड आगारातून सकाळी 8.15 सुटणारी देवगड आरे निरोमची बस कणकवली-देवगडच्या दिशेने जात होती. तोरसोळे पारवळवाडी फाट्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एसटी रस्त्याला बाजूला खाली उतरली. त्याचवेळी एसटीच्या डाव्या बाजुचा रस्ता खचला त्यामुळे बस रसत्यांखाली उतरली. सुटीचा दिवस असल्याने बसमध्ये जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

ही घटना रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारची वेळ व रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे बसमध्ये जास्त प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेची माहिती मिळताच देवगड आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवगड आगारात नुकतेच 10 ते 12 वाहक कम चालक नव्याने रुजू झाले आहेत. त्यांना कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहक किंवा चालक नवीन असेल तर त्याबरोबर अनुभवी चालक किंवा वाहक पाठवण्याची मागणी होत आहे.