अजित पवार गटाचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

अजित पवार गटातील सर्व मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असून तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांनी भेटायला गेले आहेत.