स्टायलिश हॅट

>> पूजा सामंत

एक साधी हॅट व्यक्तिमत्त्वाला ‘वेस्टर्न लुक’ देते आणि पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलून टाकू शकते.

फॅशन विश्वात अॅक्सेसरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारण कुडत्या-पायजम्यावर एक ऑक्सिडाइज्ड सेट गळय़ात घातला तरी तुमचा ‘खास’ किंवा ‘हट के लुक’ झालाच म्हणून समजा.ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हे झाले एक उदाहरण, पण काही अॅक्सेसरी अशा आहेत ज्यांचा विचार फॅशन विश्वात तसा उशिराच होतो. यात ‘हॅट’बद्दल सांगता येईल. अनेक वर्षांपासून आपले पूर्वज त्यांच्या डोक्यावर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून सफेद रंगाच्या कापडी टोप्यांचा उपयोग करत. नंतरच्या काळात या गांधी टोपी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. आजही महाराष्ट्राच्या अनेक शहरांत, गावांत टोपी वापरणे ही सवय, दैनंदिन गरज आणि संस्कृतीचा एक ठळक भाग बनला आहे. पण अनेक इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक-नायिकांनी हॅट वापरलेली आपण अनेकदा पाहिली आहे. फिरोझ खान, झीनत अमान, परवीन बाबी यांनी त्यांच्या चित्रपटांत हॅट वापरून एक स्टाइल स्टेटमेंट तयार केले होते.

हॅट फॅशन विश्वातील लाडकी अॅक्सेसरी आहे यात शंका नाही. हॅट्सची निर्मिती एक प्रमुख फॅशन अॅक्सेसरी म्हणून करणाऱया नम्रता लोढा सांगतात, हॅट्सचा प्रॅक्टिकल उपयोग किती होतो यापेक्षा त्याचा वापर एक ‘पॉवरफूल फॅशन स्टेटमेंट’ म्हणून केला जातो. ‘मायरा’ हा माझा ब्रँड. हॅटवर जर काही कलाकुसर असेल, नक्षी असेल, तर हॅट अधिक उठावदार दिसते. व्यक्तिमत्त्वात तत्काळ वेगळेपण, वैविध्य हवे असेल आणि जर सलॉनमध्ये जाऊन बॉबकट करणे, केसांना कलर करणे, महागडे वेस्टर्न ब्रँडेड कपडे घेणे या सगळय़ा खर्चिक गोष्टींना फाटा द्यायचा असेल तर डोक्यावर फक्त एक हॅट वापरली तरी वेस्टर्न लुकचा हेतू सहजसाध्य होतो. अगदी पॅज्युअल कपडय़ांसोबतदेखील हॅट वापरता येते. डिझाइन असलेली हॅट, काऊ बॉय हॅट, कापडाचे फॅब्रिक वापरून बनवलेली हॅट, वेताची-गवताची हॅट, सॅटिन, वेल्व्हेट, फ्लॉपी हॅट, राणीची हॅट (क्वीन हॅट) अशा अनेक प्रकारच्या हॅट तयार केल्या जातात, त्याला अनेक सिक्वेन्स लावून त्या फॅन्सी केल्या जातात. आपल्या वॉर्डरोबमध्ये दोन-तीन हॅट्स असल्या पाहिजेत. हॅट्स हातांनी बनवल्या जातात. स्ट्रॉ, गवताच्या काडय़ा, कधी पक्ष्यांची पिसे, मणी यांचा वापर सामन्यतः करतात. पण मी हॅट्स बनवते त्यात कपडय़ांचे उरलेले तुकडे, स्कार्फ, रिबन्स, मोती शोभेसाठी वापरते.

n अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये ‘हॅट’ पाहून त्या व्यक्तीची सामाजिक पत ठरत असे. राणी व्हिक्टोरियाच्या काळात हॅट वापरणे अतिशय फॅशनेबल समजले जात असे. हे एक शाही लक्षण मानले जाई. इंग्लंडमध्ये हॅट काही वेळेस अशी डिझाइन होत असे ज्यात स्त्राrचा चेहरादेखील झाकला जात असे. मेक्सिको, आफ्रिकन देशांत रंगीबेरंगी हॅट्स वापरल्या जात असे. प्रत्येक हॅटचे वैशिष्टय़ त्यांना इतर देशांच्या संस्कृतीपासून वेगळे करते.

n आलिया भट, कतरिना पैफ, अनुष्का शर्मा, पूजा बेदी, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक फिल्म सेलिब्रिटीज हॅट्स वापरतात. हॅट्स म्हणजे फॅशनचे प्रतिबिंब! ही एक खास अशी स्टाईल आहे.
n हॅटचा सुयोग्य वापर म्हणजे स्टायलिश असणे, स्टाइलची आवड असणे हे नक्की. विविध आकार, रंग, त्याची निर्मिती यावरून हॅट्सची किंमत ठरते. साधारण दोन हजार ते बारा हजार या बजेटमध्ये फॅन्सी हॅट्स उपलब्ध आहेत.