मुद्दा – व्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना

>> सुधा अळळीमोरे

योग एक जीवन दर्शन आहे. योग आत्मा अनुशासन आव्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना आहे. योग एक जीवन पद्धती आहे. व्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना आहे. योग आत्मोपचार आणि आत्म दर्शनाची श्रेष्ठ अध्यात्मिक विद्या आहे. योग व्यक्तिमत्त्वाला वामनापासून विराट बनवण्याची व स्वतःला संपूर्णपणे रूपांतरित करण्याची, विकसित करण्याची आध्यात्मिक विद्या आहे.

सध्याच्या असंयमित जीवनामुळे आज व्यक्तीच्या शरीरात मोठे युद्ध सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून शरीराचे वात, पित्त आणि कफ याचे प्रमाण अयोग्य झाले आहे. या दोषांच्या विषमतेमुळेच आज आपण उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, हृदयरोग, अपचन, निद्रानाशाबरोबरच कर्करोगासारख्या असाध्य रोगांना बळी पडत आहोत. योग संपूर्ण शरीराला पूर्ण रूपात ऑक्सिजन देतो आणि शरीराच्या अंतरिक अवयवांना व्यायाम देऊन व्यक्तीला संपूर्ण आरोग्य प्राप्त करून देतो.

निरोगी आरोग्य प्राप्तीसाठी आवश्यक ऑक्सिजनयुक्त रक्त, आंतरिक सूक्ष्म व्यायाम व सकारात्मक जीवनशैली या अति आवश्यक आहेत, ज्या फक्त आणि फक्त योग साधनेमुळेच प्राप्त होऊ शकतात. प्राण अर्थात ऑक्सिजन नामक तत्त्व जेव्हा आपल्या शरीरात काही निश्चित योग क्रियाद्वारे, सुनिश्चित वेळेत, सुनिश्चित प्रमाणात व योग्य वैचारिक दिशेसह स्वीकारले गेल्यास शरीरात व मनात स्वतः होऊन सकारात्मक परिवर्तन घडायला लागतात व प्राण म्हणजेच ऑक्सिजन हे संपूर्ण औषध म्हणून शरीरात कार्य करायला लागते.

आणि हाच योगविद्येचा मूलमंत्र आहे, हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे व हेच एका निरोगी समृद्ध व संवेदनशील व्यक्ती व राष्ट्राच्या निर्माणाचा आधार आहे. नियमित योग साधना दिनचर्येत समाविष्ट करून एक निरोगी, संस्कार वान, सकारात्मक, समृद्ध विचाराची व्यक्ती, कुटुंब, समाज व देश निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ही काळाची गरज पूर्ण करण्यासाठी करो योग, रहो निरोग.

(महिला वरिष्ठ राज्य प्रभारी, पतंजली योगपीठ)