कारखान्यात स्फोट; 8 कामगार बेपत्ता

छत्तीसगडमधील बेमेटारा जिह्यातील स्फोटके बनवणाया कारखान्यात शनिवारी झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर किमान आठ कामगार बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कामगारांच्या कुटुंबीयांनी कारखान्याजवळ रविवार आंदोलन केले. पिरडा गावाजवळ स्पेशल ब्लास्ट लिमिटेडमध्ये झालेल्या या स्फोटात किमान एक जण ठार झाला आणि सहा जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्यामुळे सुमारे 30 फूट खोल खड्डा पडला होता.