राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे कोरोनो पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त आहे. भजनलाल शर्मा यांनी स्वतःच एक्सपोस्टवरून ही माहिती दिली आहे. राजस्थानात सध्या कोरोनाचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शर्मा यांच्या पोस्टनुसार, प्रकृती अस्वास्थामुळे मी माझी चाचणी केल्यानंतर मला कोरोनाचं निदान झालं आहे. मी स्वतःला आयसोलेट केलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे. तसंच, आगामी नियोजित कार्यक्रमात मी व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होईन, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.