नगरमध्ये भाजपचा मनसेला ठेवले दूर; विखेंचा उमेदवारी अर्ज भरताना मनसेने फिरवली पाठ

भाजपला मनसेने पाठिंबा दिला आहे. तसेच भाजपने मनसेला नगरमध्ये लांबच ठेवल्याचे दिसून आले आहे. विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेला निमंत्रण मनसेला निमत्रणच देण्यात आले नव्हते. त्यामुळे याबाबतच्या चर्चा नगरमध्ये होत आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर विखे किंवा भाजपकडून आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे आमचा एकही पदाधिकारी तिथे गेला नाही, असे त्यांनी सांगितले.

नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वजण व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वांची नावे घेऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत केले. त्यावेळी जिल्हाध्यक्षांचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, ते व्यासपीठावरच हजरच नव्हते, असे उघड झाले आहे. त्यामुळे याचीही नगरच्या राजकारणात चर्चा होत आहे.

मनसेने भाडपला पाठिंबा देत महायुतीचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेला बोलवण्यात आले नाही. त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला त्यांच्याकडून कोणतीही निमंत्रण आलेले नाही. त्यांची यंत्रणा नेमकी काय काम करते, हा खरा प्रश्न आहे, असे मनसेच्या एका पदाधिऱ्याने सांगितले. आम्हाला निमंत्रणच नसल्याने आमचा एकही पदाधिकारी या सभेला हजर नव्हता, असे ते म्हणाले. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अशा पद्धतीने वागणूक मिळाल्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याची चर्चा नगरमध्ये होत आहे.