भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखविले काळे झेंडे; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केला निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांनी तुळजापूर येथे काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापत आहे. या मुद्द्यावरून आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आज बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

मराठा आंदोलकांच्या वतीने ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’च्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना बाजूला केले. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली.