हिंदुस्थानच्या गुकेशने बुद्धिबळात घडवला इतिहास, कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू

हिंदुस्थानचा 17 वर्षीय ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या गेलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत इतिहास घडविला. ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला, हे विशेष. याचबरोबर पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा पहिला हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरलाय. आता जगज्जतेपदाच्या लढतीत गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होईल.

कास्परोव्हचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्परोव्हचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. 1984 मध्ये कास्परोव्हने वयाच्या 22व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळची स्पर्धा जिंकून कास्परोव्हने त्याचाच देशबांधव जगज्जेत्या कारपोव्हला आव्हान दिलं होतं.