चारकोपमध्ये नागरी कामांचा धडाका; शिवसेनेकडून सुशोभीकरणाची अभिनव संकल्पना

शिवसेनेकडून कांदिवलीत अनेक विकासकामांबरोबर नागरी सुविधा देणारी कामेही सुरू असून त्या माध्यमातून परिसरातील पथदीप सुशोभीकरण, संरक्षण भिंत, शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा धडाका सुरू आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, आमदार विलास पोतनीस यांच्या निधीतून आणि नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या प्रयत्नातून ही नागरी कामे सुरू आहेत.

प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध विकासकामे राबवण्यासाठी नगरसेविका शुभदा गुढेकर यांनी पुढाकार घेतला असून शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्याकडून नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. चारकोप मार्केट चौक पथदीप सुशोभीकरण करण्यात आले. सेक्टर क्र. 1 मध्ये ‘आय लव्ह चारकोपचा राजा’ या संकल्पनेवर आधारित तर सेक्टर क्र. 2 मध्ये ‘आय लव्ह चारकोपची आई’ या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण करण्यात आले. यावेळच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार विलास पोतनीस, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, विभाग संघटक मनाली चौकीदार, चारकोप विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख राजू खान, विनायक सामंत उपस्थित होते.

संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ

रामदास कदम यांच्या निधीतून युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या सहकार्याने चारकोप प्रभाग क्र. 19, आदित्य इमारतीच्या समोर संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ झाला. पालिकेच्या माध्यमातून शाळा सेक्टर क्र. 2 शाळा चारकोप गाव येथे नूतनीकरण केलेल्या शाळेचा आरंभ करण्यात आला.