
‘मत चोरी’चा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सोमवारी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोच्या सहा स्थानकांवरील प्रवेश आणि निकास (Entry-Exit) दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जनपथ, मंडी हाऊस, बाराखंबा रोड, सेंट्रल सेक्रेटरीएट, राजीव चौक आणि पटेल चौक या स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद राहील, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितले. तथापि, प्रभावित झालेल्या सर्व स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा उपलब्ध राहील, असे डीएमआरसीने स्पष्ट केले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक माहिती दिली जाईल. तरीही, संबंधित सर्व मेट्रो स्थानकांवर इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहील, असेही डीएमआरसीने नमूद केले.




























































