बडे मियाँ हॉटेलवर एफडीएचा छापा

मुंबईतील प्रसिद्ध फूड जॉइंट बडे मियाँवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)आज कारवाई केली. पर्ह्ट परिसरातील बडे मियाँच्या तीन आस्थापनांवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी केलेल्या तपासणीत आवश्यक परवाना नसल्याचे तसेच काही त्रुटी आढळून आल्या.

वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये चिकन थाळीत उंदीर आढळल्यानंतर एफडीएने त्याची गंभीर दखल घेत हॉटेल तपासणीची मोहीम उघडली आहे. त्याच अनुषंगाने एफडीएने आज फोर्ट परिसरातील बडे मियाँ या नामांकित हॉटेलवर धडक दिली. त्याच परिसरातील बडे मियाँच्या तीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी आवश्यक परवाना नसल्याचे तसेच काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे ते तिन्ही आस्थापनांवर कारवाई  करण्यात आल्याचे  एफडीएचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले. तर एफडीएचे पथक आज हॉटेलवर आले होते. त्यांनी हॉटेलची तपासणी केली. हॉटेलशी संबंधित कागदपत्र आम्ही त्यांना दाखवले. केवळ एफडीएचा परवाना नसून त्याकरिता अर्ज केला असल्याचे हॉटेलचे मालक इफ्तिकार शेख यांनी सांगितले.