
अमेरिकी न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज मोठा दणका दिला. ’एच वनबी’ व्हिसावर अमेरिका सरकारने लावलेले 1 लाख डॉलरचे शुल्क बेकायदा ठरवत न्यायालयाने ते रद्द केले. फेडरल कोर्टाच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकी नागरिकांना अधिकाधिक नोकऱ्या मिळाव्यात म्हणून स्थलांतरितांना अटकाव घालण्याच्या उद्देशाने ट्रम्प यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एच वन बी व्हिसावर जबर शुल्क जाहीर केले होते. या शुल्काला अमेरिकेतील 20 राज्यांच्या ऍटर्नी जनरल्सनी बोस्टन न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर जिल्हा न्यायाधीश लिओ सोरोकिन यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यांनी हे शुल्क बेकायदा ठरवत रद्द केले.




























































