
जूनचा अर्धा महिना उलटत आला तरी मान्सूनच्या सरीचं आगमन झालेलं नाही. राज्यातील काही भागात एक दोन सरी कोसळल्या. मात्र, अद्यार संपूर्ण राज्यात पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच उकाडा वाढल्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईतही येत्या काळात प्रचंड उकाडा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात अजून पाच दिवस तरी पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून पाच दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पुढील ४-५ दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगेकूचीचा वेग मंदावू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी असून मान्सून सक्रिय होण्यास अजून वेळ लागेल. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे मान्सूनचा वेग मंदावला असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील ४-५ दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगेकूचीचा वेग मंदावू शकतो. pic.twitter.com/8lb1fxLJZm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 13, 2026
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभर मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी 5 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती थांबली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडील काही भागांत मान्सूनने पुढील वाटचाल केली असली तरी महाराष्ट्रात त्याची गती मंदावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
एल निनो सक्रिय झाला असून त्याचा परिणाम म्हणून मान्सूनला ब्रेक लागला आहे. पुढचे काही दिवस पावसाची ओढ राहणार आहे. पुढील आठवडाभर पावसाची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी समुद्रातील नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलाने मान्सूनची वाटचाल मंदावली आहे.
यंदा एल निनो चा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून एल निनोमुळे पाऊस लांबला आहे. राज्यात 20 जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर जाणार असून पेरण्या लांबणीवर गेल्यास उत्पादनावर होणार परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.




























































