माजी नगरसेवक बाळ नरे यांचे निधन

निष्ठावंत शिवसैनिक, उत्कृष्ट संघटक,कार्यशील शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवक बाळ नरे यांचे आज मालवण येथील रेवतळा गावात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता निघणार आहे.

बाळ नरे हे शिवसेना परळ शाखेचे 15 वर्षे शाखाप्रमुख होते. त्यानंतर त्यांनी एक टर्म नगरसेवक म्हणून काम पाहिले. त्यांनी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरे पार्कचे अध्यक्ष म्हणूनही बरीच वर्षे काम केले. गेले काही वर्षे ते मालवणमध्ये त्यांच्या रेवतळा या गावी राहत होते.