
नांदेडमध्ये मसाज सेंटरवर छापेमारी करत पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या चार महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमातील कलम ४, ५, ६ व ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.




























































