खातेदार आणि पतसंस्थेची कोट्यावधीची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरातील नंदी स्टॉप भागातील श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये शाखाधिकारी लेखापाल आणि अन्य एक अशा तिघांनी तब्बल दोन कोटी 44 लाख 69 हजार 590 रुपयांचा अपहार केल्याची घटना घडली. संबंधित खातेदार आणि पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पतसंस्थेचे कार्यकारी संचालक माधव बाबुराव अंकुलगे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की. श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे तत्कालीन शाखा अधिकारी नामदेव रामराव गड्डीमे आणि लेखापाल दत्तात्रय उमाकांत लखादिवे आणि सोबत एक यांनी संगणक करून पतसंस्थेतील ठेवतारण कर्ज प्रकरणात खातेदारांच्या परस्पर रोख स्वरूपात रक्कम उचलून संबंधित खातेदाराची तसेच पतसंस्थेची दिशाभूल करून नियमबाह्यपणे मुदत ठेवीवर कर्ज प्रकरणे अतिरिक्त व्याजाची आकारणी करून तब्बल 2 कोटी 44 लाख 69 हजार 590 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी तिघाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.