
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने 4 हजारांनी घसरून 1.48 लाख रुपये प्रति तोळ्यावर आले. तर चांदीच्या किंमतीतसुद्धा 9 हजार 658 रुपयांची घसरण झाल्याने चांदी दोन लाख 36 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. 31 मे रोजी चांदीची किंमत दोन लाख 63 हजार रुपये होती. या महिन्यात सोने 3.44 टक्के घसरले आहे.






























































