वर्ल्ड कपसाठी हॉस्पिटलचेही बुकिंग; हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींचा फंडा

हिंदुस्थानपाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना रंगणार आहे. हा हायव्होल्टेज सामना याचि तेही याचि डोळा बघण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुर झाले आहेत. त्यामुळे जसजसा हा सामना जवळ येत आहे तसतशा अहमदाबादमधील हॉटेल्सच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशविदेशातील क्रिकेटप्रेमींनी हॉटेलऐवजी हॉस्पिटलच्या रूम बुक करण्याचा फंडा वापरायला सुरुवात केली आहे.

बॉडी चेकअपच्या बहाण्याने करताहेत रूम बुक 

अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलमधील डॉ. पारस शाह म्हणाले की, लोक हॉस्पिटलमध्ये फुल बॉडी चेकअपच्या बहाण्याने एकदोन दिवसांसाठी रूम बुक करत आहेत. 15 ऑक्टोबरसाठी अहमदाबादमधील बहुतांश हॉटेल्स आधीच फुल्ल झाली आहेत. एका हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. निखिल लाला म्हणाले, आमच्याकडे बॉडी चेकअप, नाईट स्टे यासाठी काही पॅकेज आहेत. हिंदुस्थानपाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्याची तारीख जाहीर होताच 14 15 ऑक्टोबरसाठी अॅडवान्स बुकिंगसाठी पॅनडा व दिल्ली येथून चौकशी होत आहे. काही लोपं तर विचारतात की, तुमच्या हॉस्पिटलपासून क्रिकेट स्टेडियम किती दूर आहे. आणखी एका हॉस्पिटलचे सीईओ नीरज लाल म्हणाले, ऑक्टोबरच्या दुसऱया व तिसऱया आठवडय़ासाठी बॉडी चेकअपच्या बुकिंगसाठी थेट केनियामधूनही चौकशी होत आहे.

हॉस्पिटलने किमती वाढविल्या नाही म्हणून 

एका पंचतारांकित हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबादमध्ये सणाच्या हंगामातही लोक पैसे वाचविण्यासाठी हॉटेलऐवजी हॉस्पिटलच्या रूम बुक करत असतात. कारण हॉस्पिटलकडून हंगामानुसार दरात वाढ केली जात नाही. त्यामुळे हॉस्पिटलच्या रूम हॉटेल्सच्या तुलनेत खूप परवडतात. कारण येथे अॅडमिट झाल्यास रूम, जेवण आणि देखभालही होते. त्यामुळे हिंदुस्थानपाकिस्तान सामन्याच्या वेळी पैसे वाचविण्यासाठी क्रिकेटप्रेमींकडून हॉटेल्सऐवजी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याचा फंडा वापरला जात आहे.