फिफा क्रमवारीत हिंदुस्थान नव्वदीत 

सॅफकप स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱया हिंदुस्थानी फुटबॉलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सॅफ कप स्पर्धेतील अजिंक्यपदानंतर फिफा क्रमवारीत हिंदुस्थानी फुटबॉल संघाने  नव्वदीत एंट्री करताना 99 व्या स्थानी झेप घेतली आहे.  

सॅफ कप स्पर्धेमध्ये लेबनॉननेदेखील दोन गुणांची प्रगती केली असून ते हिंदुस्थानपेक्षा एक स्थान मागे आहेत. फिफा स्पर्धेतील कामगिरीमुळे कुवैतच्याही स्थानात सुधारणा होऊन ते 137 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. 

99 व्या स्थानावर पोहचणाऱया हिंदुस्थानचे 1208.69 गुण झाले आहेत. 1996 मध्ये हिंदुस्थानने फिफाच्या रँकिंगमध्ये 94 व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. 1993 मध्येही 99 व्या क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 2017 आणि 2018 मध्ये 96 वा क्रमांक होता. गेल्या महिन्यापर्यंत हिंदुस्थानी संघ 100 व्या स्थानावर होता. विश्वविजेत्या अर्जेंटिनाने फिफा क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड आणि बेल्जियम अशी क्रमवारी आहे. आशिया देशांत जपान 20, त्यानंतर इराण (22), ऑस्ट्रेलिया (27), कोरिया (28) आणि सौदी अरेबिया (54) असे हे टॉप फाईव्ह देश आहेत.