Asia Cup 2023- हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्यावर पाणी; सोमवारी होणार सामना

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर टिम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-4 चा सामन्यावर पाणी पडले आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. मात्र, मैदान ओले असल्याने आजचा सामना होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी आजच्या धावसंख्येपासून पुढे हा सामना खेळवण्यात येणार आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत या दोन संघांमध्ये 2 सप्टेंबर रोजीचा ग्रुप स्टेजमधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सुपर-4 सामन्यावरही पावसाचे पाणी पडले. रविवारी सुरू झालेला सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता.

सामन्याची सुरुवात झाल्यावर रोहित शर्माने 56 धावा काढत अनेक विक्रम केले. भारतीय संघाच्या 24.1 षटकात 2 गडी बाद 147 धावा झाल्या असताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला. रोहित शर्माने 56 धावा तर गिलने 58 धावा केल्या. विराट कोहली 8 तर के.एल. राहुल 17 धावांवर खेळत आहे. पावसामुळे मैदान ओले झाले आहे. त्यामुळे आज सामना खेळवणे शक्य नसल्याने सोमवारी आजच्या धावसंख्येपासून पुढे सामना खेळवण्यात येणार आहे.