IPL 2024 : क्सालेनचा क्लास खेळ! मात्र शेवटच्या क्षणी कोलकाताने मारली बाजी…

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर कोलकाताने बाजी मारुन आयपीएलच्या सतराव्या हंगामाची वियजी सुरुवात केली.

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सर्वात महागडे ठरलेले पॅट कमिंन्स आणि मिशेल स्टार्क या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या होत्या. तत्पुर्वी नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कोलकाताला घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रीत केले. सॉल्ट (54), रमणदीप सिंग (35), रिंकू सिंग (23) तसेच रस्सलच्या वादळी खेळीने कोलकत्ताला 208 ही आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या उभारण्यात यश आले. रसलतने ताबडतोब फलंदाजी करत अवघ्या 25 धावांमध्ये 64 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 7 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. सनराझर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मार्कंडेने 2 आणि कर्णधार कमिंन्सला 1 गडी बाद करण्यात यश आले.

209 धावांचा डोंगर भेदण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या हाताता आलेला सामना निसटला. मयंग अगरवाल (32) आणि अभिषेक शर्मा (32) या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करुन देत 60 धावांची भागी केली. त्यानंतर आलेल्या राहूल त्रिपाटी (20) आणि अॅडन मार्कराम (18) यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. हेनरिक क्लासेनने क्लास खेळ दाखवत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. क्लासेनने 29 चेंडूंमध्ये 8 षटकार ठोकून 63 धावांची वादळी खेळी करत संघाला अगदी विजयाच्या जवळ आणून दिले. 19 व्या षटकात मिचेल स्टार्कचा खरपूस समाचार घेत क्लासेनने सामन्याला कलाटणी दिली. शेवटच्या षटकात 6 चेडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती. क्लासेनने हर्षित राणाच्या पहिल्यां चेडूंवर षटकार ठोकून धावांमधले अंतर कमी केले. शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शहबाद अहमद (16) या धावसंख्येवर बाद झाला. चौथ्या चेंडूंवर मार्को जॅन्सनने एक धाव क्लासेनला काढून दिली. सामना आता सनराझर्स हैदराबाद जिंकणार असे वाटत असतानाचं पाचव्या चेंडूवर क्लासेन बाद झाला आणि सामना कोलकाताच्या बाजूने झूकला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना हर्षित राणाने निर्धाव चेंडू टाकला आणि कोलकाताचा विजय झाला. कोलकाताकडून मिचेल स्टार्कला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. हर्षित राणाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने 2, वरुण चक्रवर्ती आणि सुनीन नरेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.