Israel Iran War : इस्रायलचा पलटवार, ड्रोन-क्षेपणास्त्रांनी इराणवर केला हल्ला

इराण आणि इस्त्रायलमधील तणाव वाढत चालला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या इसाफहान शहरातील स्फोटांचे आवाज विमानतळावर ऐकू आल्याचे इराणी वृत्तसंस्था फार्सने सांगितले. सीएनएनच्या वृत्तानुसार, अनेक उड्डाणे इराणच्या हवाई क्षेत्रात वळविण्यात आली आहेत. मात्र या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही

 गेल्या आठवड्यात इराणने सीरियातील आपल्या दूतावास परिसरामध्ये केलेल्या संशयित इस्रायल हल्ल्यानंतर प्रत्योत्तर म्हणून शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्त्रायली हद्दीत पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आली होती. इराणने सिरियाची राजधानी दमिश्मक मध्ये त्यांच्या राजनैतिक परिसरात 1 एप्रिलला झालेल्या हल्ल्याचा संशय इस्त्रायलवर व्यक्त करण्यात आला होता. ज्यामध्ये इराणी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डचे वरिष्ठ जनरल सहित सात सदस्यांचा मृत्यू झाला होता. इराणने या हल्ल्याच्या प्रत्योत्तरासाठी इस्त्रायवर हल्ला केला होता.

हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले पश्चिमी आशियात स्थिरता गरजेची आहे. तिथे जवळपास 1 कोटी हिंदुस्थानी नागरीक राहतात.ते म्हणाले, “आमच्या व्यावसायिक शिपिंगचा मोठा भाग याच प्रदेशातून जातो आणि तेलही तिथूनच येते. हा अतिशय संवेदनशील प्रदेश आहे; त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचा तणाव आणि शत्रुत्व असते तेव्हा आम्ही खूप तणावाखाली असतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.