जळगाव जिह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

जळगाव जिह्यात तापमानाने उच्चांक गाठला असताना शनिवारी रात्री जिह्याच्या काही भागांत वादळी वाऱयासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. जिह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

जळगाव जिह्यासह एकीकडे तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक उन्हाने त्रस्त झाले असताना जिह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. भुसावळ परिसरात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी फलकही खाली पडले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागा होरळपत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे.