दहावीच्या परीक्षेतही कोकण बोर्ड राज्यात अव्वल, कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. कोकण बोर्डाने राज्यात सलग तेराव्यांदा अव्वल क्रमांक पटकावला. कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्के लागला आहे. कोकण बोर्डातून 26 हजार 780 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 26 हजार 517 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.85 टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 99.35 टक्के लागला आहे. दोन्ही जिल्ह्यात मुलींनी उत्तीर्ण होण्यामध्ये बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींचा निकाल 99.62 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा निकाल 99.28 टक्के आहे.

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. कोकण बोर्डाने राज्यातील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्क्के लागला. कोकण बोर्डातून 13 हजार 735 मुलगे परीक्षेला बसले. त्यापैकी 13 हजार 551 मुलगे उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.66 टक्के आहे. कोकण बोर्डातून 13 हजार 045 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 12 हजार 966 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.39 टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 9 हजार 159 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 9 हजार 016 मुले उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.43 टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 8 हजार 833 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 8 हजार 770 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.28 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 हजार 576 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 4 हजार 535 मुले उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99. 10 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 हजार 212 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 4 हजार 196 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.62 टक्के आहे.

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक
कोकणातल्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण बोर्डात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.73 टक्क्याने अधिक आहे. कोकण बोर्डामध्ये 13 हजार 735 मुलगे परीक्षेला बसले. त्यापैकी 13 हजार 551 मुलगे उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.66 टक्के आहे. कोकण बोर्डातून 13 हजार 045 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 12 हजार 966 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.39 उतक्ते आहे अशी माहिती कोकण बोर्डाच्या सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली. यावेळी सहाय्यक सचिव एच.के. शिंदे, शाखाप्रमुख आम्रपाल बनसोडे, विभागप्रमुख अनिता कुलकर्णी उपस्थित होत्या.

निकालात 0.09 टक्क्याने वाढ
दरवर्षीप्रमाणे कोकण राज्यात अग्रेसर ठरले आहे. यंदा कोकण बोर्डाच्या निकालात 0.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी मार्च 2023 ला कोकण बोर्डाचा दहावीचा निकाल 98.11 टक्के होता. यंदा हा निकाल 99.01 टक्के लागला आहे.

कॉपीचे एक प्रकरण
दहावीच्या परीक्षेच्या काळात कॉपीचे एक प्रकरण सापडले आहे. कॉपीचे एक प्रकरण रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आहे. गतवर्षीच्या परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत कॉपीची दोन प्रकरणे सापडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र कॉपीचे एकही प्रकरण सापडलेले नाही.

फाटक हायस्कूलच्या सई अवसरेला 99.40 टक्के
फाटक हायस्कूल, रत्नागिरीच्या सई राजेश अवसरे हिला 500 पैकी 497 गुण मिळाले. तिला 99.40 टक्के गुण मिळाले आहेत. वीणा योगेश काळे हिला 500 पैकी 492 गुण मिळाले आहेत. तिला 98.40 टक्के गुण मिळाले आहेत. मिहिका प्रणव परांजपे हिला 500 पैकी 489 गुण मिळाले आहेत. तिला 97.80 टक्के गुण मिळाले आहेत. पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या गार्गी पावसकर हिला 99.20 टक्के गुण मिळाले आहेत.