लातूर विभागाचा दहावीचा निकाल 95.27 टक्के; लातूर विभागातही मुलीच अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 95.27 टक्के लागला असून, महाराष्ट्रात लातूर विभाग सातव्या स्थानावर आहे. लातूर विभागातील 1 लाख 5 हजार 789 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 1 लाख 4 हजार 503 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 99 हजार 570 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागाच्या निकालाची टक्केवारी 95.27 एवढी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा घेण्यात आली. आज या परीक्षेचा निकाल विभागाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. लातूर विभागामध्ये १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामधील १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागामध्ये ४५ हजार ५९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये ३१ हजार ९३१, द्वितीय श्रेणीमध्ये १७ हजार ५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर ४ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

लातूर विभागात ५७ हजार ३४६ मुलांनी ४८ हजार ४४३ मुलींनी असे एकूण १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५६ हजार ६०६ मुलांनी तर ४७ हजार ९०२ मुलींनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्यातील ५३ हजार १३८ मुले आणि ४६ हजार ४३२ मुली असे एकूण ९९ हजार ५७० उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.८८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.९३ टक्के राहिली आहे.

लातूर विभागात ९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. एकूण निकालाच्या ९.७६२ टक्के हे प्रमाण आहे. ८५ ते ९० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी संख्या एकूण निकालच्या ११ टक्के असून, विद्यार्थी संख्या ११ हजार ७७ एवढी आहे. ८० ते ८५ टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार ४६४ असून, त्याची टक्केवारी १२.३८ एवढी आहे. ७५ ते ८० टक्के गुण घेणारे १२ हजार २७६ विद्यार्थी आहेत. एकूण निकालाच्या १२.१९ टक्के हे प्रमाण आहे. ७० ते ७५ टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ४४३ असून, एकूण निकालाच्या ११.३६ टक्के हे प्रमाण आहे. ६५ ते ७० टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रमाण १०.३२ टक्के असून, विद्यार्थी संख्या १० हजार ३९५ एवढी आहे. ६० ते ६५ टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार २०५ एवढी असून, एकूण निकालाच्या १०.१३ टक्के हे प्रमाण आहे. ४५ ते ६० टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ६५८ असून, एकूण निकालाच्या १७.५३ टक्के हे प्रमाण आहे. लातूर विभागात ४५ टक्के पेक्षा कमी गुण घेणारे ५ हजार ३५४ विद्यार्थी असून, एकूण निकालाच्या ५.३१७ टक्के हे प्रमाण आहे.

लातूर जिल्ह्याचा निकाल विभागात अव्वल
लातूर विभागीय परीक्षा मंडळामध्ये नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा असून, सर्वात कमी निकाल नांदेड जिल्ह्याचा आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १७ हजार ८०० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १३ हजार ६४९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ८ हजार ३९० विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लातूर जिल्ह्याचा निकाल ९६.४६ टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यात ३८ हजार ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ३७ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८ हजार ५९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ११ हजार २५० विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५ हजार ७३७ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील एकूण ३६ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

धाराशिव जिल्ह्याचा निकाल ९५.८८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २२ हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. २१ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ९ हजार ७२१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ७ हजार ३२ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ३ हजार ४५२ विद्यार्थी, उत्तीर्ण श्रेणीत ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात एकूण २० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ७८६ मुलांनी, २२ हजार २८३ मुलींनी असे एकूण ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २१ हजार ९२८ मुले, २० हजार ४३४ मुली असे एकूण ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.१८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.१ टक्के राहिले.

धाराशिव जिल्ह्यातील ११ हजार ७८२ मुलांनी तर ९ हजार ९८७ मुलींनी असे एकूण २१ हजार ७६९ जणांनी परीक्षा दिली. ११ हजार १३० मुले आणि ९ हजार ७४३ मुली असे एकूण २० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धाराशिव जिल्ह्यातील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.४६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.५५ टक्के राहिले.

लातूर जिल्ह्यातील २१ हजार ३३ मुलांनी तर १६ हजार ६३२ मुलींनी असे एकूण ३७ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २० हजार ८० मुले आणि १६ हजार २५५ मुली असे एकूण ३६ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.७३ टक्के राहिले.
लातूर जिल्ह्यात लातूर तालुक्याचा निकाल ९६.५३ टक्के लागला आहे. अहमदपूर तालुक्याचा निकाल ९६.३३ टक्के, औसा तालुक्याचा ९६.१ टक्के, चाकूर तालुक्याचा निकाल ९५.८७ टक्के, देवणी तालुक्याचा निकाल ९७.६६ टक्के, जळकोट तालुक्याचा निकाल ९७.३९ टक्के, निलंगा तालुक्याचा निकाल ९५.८५ टक्के, रेणापूर तालुक्याचा निकाल ९६.१३ टक्के, शिरूर अनंतपाळ तालुक्याचा निकाल ९५.३९ टक्के, उदगीर तालुक्याचा निकाल ९७.१५ टक्के लागला आहे.

लातूर विभागात प्रथम भाषा मराठी विषयाचा निकाल ९६.५३ टक्के, प्रथम भाषा हिंदी विषयाचा निकाल ८८.७३ टक्के, इंग्रजी विषयाचा निकाल ९९.२० टक्के, उर्दू प्रथम भाषेचा निकाल ९५.८३ टक्के, हिंदी द्वितीय भाषेचा निकाल ९६.११ टक्के, मराठी द्वितीय भाषा ९५.८१ टक्के, इंग्रजी द्वितीय भाषा ९५.९९ टक्के लागला आहे. संस्कृत भाषेचा ९९.५८ टक्के, गणित विषयाचा निकाल ९७.१६ टक्के, विज्ञान तंत्रज्ञान चा निकाल ९७.३९ टक्के लागला आहे.