लातूरात अपार्टमेंटमधील बंद घर फोडले, रोख रक्कमेसह लाखोंचा मुद्देमाल पळवला

लातूर शहरातील केशवनगर भागातील एका अपार्टमेंटमधील घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 2 लाख 42 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल पळवला सदरील चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजाराम बाबुराव चौरे (रा. फावडेवाडी तालुका रेनापुर सध्या राहणार केशवनगर ब्राईट आर के अपार्टमेंट फ्लॅट नंबर 301) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे की फिर्यादी हे 8 एप्रिल रोजी गुढीपाडवा आणि गावात राहत असल्यामुळे परिवारासह फावडेवाडी येथे गेले होते. त्यांच्या शेजारी राहणारे मेहुणे ज्ञानोबा व्यंकट केदार यांच्या पत्नीने त्यांना फोन करून सांगितले की तुमचे घराचा दरवाजा कोंडा कुलूप तुटलेला दिसत आहे त्यामुळे फिर्यादी आपल्या पत्नीसह घटनास्थळी आले.

दि. 13 एप्रिल रोजी रात्री 10.00 ते दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 06.00 वाजण्याचे सुमारास घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला . घरातील बेडरूम मधील लोखडी कपाटातील ठेवलेले सोन्याचे पेन्डल 10 ग्रॅम 150 मिली ग्रॅमचे जुने वापरते कि.अंदाजे 54,307/- रूपये, सोन्याचे झुमके फुले व सरपाळे 12 ग्रॅम 500 मिलीग्रॅमचे जुने वापरते किं.अंदाजे 63,050/- रुपयाचे तसेच देवघरातील लाकडी बॉक्समध्ये ठेवलेले नगदी रोख रक्कम 1,25,000/- रूपये असा एकुण 2,42,357/-रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. तक्रारदार कामानिमित्त बाहेरगावी असल्याने उशीरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.