Video: भोपाळहून दिल्लीला येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग

भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून निजामुद्दीनच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या C 14 कोचला पहाटेच्या सुमारास ही आग लागली आहे. ही घटना बीना स्थानकाच्या आधी असणाऱ्या कुरवई येथे घडली. डब्यात बसवलेल्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याची शक्यता आहे. दरम्यान ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या डब्यात एकूण 36 प्रवासी होते. आगीची माहिती मिळताच कुरवई येथे सकाळी 7.10 वाजता ही गाडी थांबवण्यात आली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)