आता मी तरी जाईन, नाहीतर सरकार! मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, वेगवेगळय़ा गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. 28 ऑगस्टपर्यंत आमच्या सर्व मागण्या करा, अन्यथा 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. दिल्लीत मराठा समाजाचे अधिवेशन घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मराठा आरक्षणासह इतर प्रश्नांच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी  -येथे राज्यव्यापी बैठक बोलावली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारशी आरपारच्या लढाईची घोषणा केली. ‘आता मी तरी राहणार पिंवा सरकार तरी राहणार!’ असेही ते म्हणाले.