Mumbai crime news – नूडल्सच्या पाकिटातून हिऱ्याची तस्करी

नूडल्सच्या पाकिटातून हिरे तस्करी करणाऱ्याला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) ने अटक केली. सईद जाफर असे त्याचे नाव असून तो कर्नाटकच्या अलीपूरचा रहिवासी आहे. त्याच्याकडून 2 कोटीचे हिरे जप्त केले आहे. तो ते हिरे घेऊन बँकॉकला जाणार होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे/सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. सईद हा बंगळुरू येथून विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. तो विमानाने बँकॉकला जाणार होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला एआययुच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली. सईदच्या बॅगेत एक नूडल्सचे पाकीट आढळून आले. त्या पाकिटाची तपासणी केली असता त्यात दोन कोटी रुपयाचे हिरे होते. सईद हा डिलिव्हरी  बॉयचे काम करतो. ते हिरे तो बँकॉक येथे एकाला देणार होता. हिरे तस्करीच्या मोबदल्यात त्याला कमिशन मिळणार होते. सईदला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.