मध्य प्रदेशातही ‘सूरत’चे वारे; इंदूरमधून काँग्रेसच्या उमेदवाराची माघार

गुजरातच्या सूरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद केल्यानंतर इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचा उमेदवार बिवनिरोध विजयी झाला आहे. या सूरत प्रकरणावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. मात्र, आता सूरतचे हे वारे मध्य प्रदेशपर्यंत पोहचले आहे.

मध्य प्रदेश येथील इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभेसाठीचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अक्षय कांती बम यांनी निवडणुकीतून माघार घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबत सेल्फी शेअर केली असून भाजपमध्ये त्यांचे स्वागत केले आहे. भाजपने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळत निवडणुकीआधीच फोडाफोडीचे राजकारण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.