राजकीय कटुता वाढत आहे, आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने भाजपला खडसावले

भाजपने तृणमूल काँग्रेसविरोधात तयार केलेल्या जाहिराती प्रसारीत करू नये, असे आदोश कोलकाता न्यायालयाने दिले होते. या निकालाच्या विरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोलकाता न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत भाजपला चांगलेच सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करताना भाजपला चांगलेच सुनावले आहे. तसेच तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो, याचे भान ठेवा, असेही न्यायालयाने भाजपला सुनावले आहे.

या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही भाजपला दणका दिला आहे. याप्रकरणी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. प्रथमदर्शनी तुमच्या जाहिराती चुकीच्याच आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपच्या तृणमूलविरोधातील याचिकांवर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने भाजपला आदेश दिले आहेत की तृणमूलविरोधात बनवलेल्या जाहिराती 4 जूनपर्यंत प्रसारित करू नका. या निकाला विरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही भाजपला दणका दिला आहे. तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो, असेही न्यायालयाने भाजपला सुनावले आहे.

न्यायमूर्ती जितेंद्र महेश्वरी म्हणाले, तुमच्या जाहिरातींमधून तुम्ही अनेक मुद्दे मसाला लावून सादर केले आहेत. आम्ही कोलकाता न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास इच्छूक नाही.यावर भाजपचे वकील पटवालिया म्हणाले, कोलकाता उच्च न्यायालयात आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. किमान आमचा युक्तिवाद तरी ऐकून घ्या. त्यावर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन म्हणाले, तुमच्या जाहिराती खूप अपमानकारक आहेत. राजकीय कटुता वाढत चालली आहे आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. न्यायमूर्ती जितेंद्र महेश्वरी म्हणाले, हा खटला सर्वोच्च न्यायालयात चालवण्यात येऊ नये. कोलकाता उच्च न्यायालयाने याप्रकरणी उचित निकाल दिला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेपाची गरज नाही. आम्ही तुम्हाला निवडणूक लढू नका असे म्हणालो नाही. मात्र यात हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छूक नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.