भाजपला इंडिया आघाडीची धास्ती; विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची अमित शहा यांची कबुली

लोकसभा निवडणुकांच्या सहा टप्प्यातील मतदान झाले असून आता सातव्या टप्प्यातील मतदान आणि निकालाची प्रतीक्षा होत आहे. निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यानंतर इंडिया आघाडीने विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केल्यानंतर भाजपनेही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, तो फोल ठरण्याची शक्यता आहे. 2014 प्रमाणे यंदाही मोदी लाटेमुळे भाजपचा विजय होईल, अशी आशा भाजपला होती. मात्र, मोदींची हवा आणि त्यांच्या चेहरा निवडणुकीत चाललाच नाही. त्यामुळे भाजपला पराजयाची भीती वाटत आहे.

या निवडणुकीत मोदींचा करिश्मा दिसलाच नाही. तसेच भाजपविरोधात देशातील अनेक महत्त्वाच्या पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. स्थापनेपासूनच भाजपने या इंडिया आघाडीची धास्ती घेतली होती. तसेच इंडिया आघाडीवरून जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, जनतेनेच आता भाजपला नाकारल्याचे चित्र सहाव्या टप्प्यानंतर दिसत आहे. त्यामुळे भाजपची धास्ती आणखी वाढत आहे. देशभरात विरोधकांनी भाजपला जबरदस्त टक्कर दिली, अशी कबुलीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

देशात सशक्त विरोधी पक्ष नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक सोपी जाईल, असा अंदाज भाजपला होता. मात्र, देशातील महत्त्वाच्या पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आणि भआजपला जबरदस्त टक्कर दिली. गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुली शहा यांनी दिली. आता 4 जूना लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता निकालाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची कबुली शहा यांनीच दिल्याने त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.