Google Maps वर WhatsApp सारखे लाइव्ह लोकेशन शेअरिंगचे नवे फिचर

गुगल मॅप्स हा अ‍ॅप अचूक रस्ते किंवा मार्ग शोधण्याकरीता वापरण्यात येतो. अचूक रस्त्यांसह निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ तसेच कोणत्या मार्गाने गेल्यास निश्चित ठिकाणी लवकर पोहोचता येईल याचा आढावा देणाऱ्या या अ‍ॅपचा वापर जगभरातील लोक करतात. अलिकडेच गुगल मॅप्सने विविध टोल नाक्यांवरील टोलबाबत माहिती दिली जाणारे फिचर अ‍ॅड करण्यात आले होते. आता पुन्हा गुगल मॅप्सने नवे फिचर आणले आहे.

गुगल मॅप्सने व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामसारख लाईव्ह लोकेशन पाहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा पर्यायामध्ये लाईव्ह लोकेशन कुटुंबासमवेत आणि मित्र परिवारासमवेत शेअर करता येणार आहे. त्याचबरोबर हे लोकेशन कितीकाळ शेअर करायचे आहे याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पर्यायांसोबत लोकेशन शेअर केलेल्या व्यक्तीला फोनची बॅटरी, फोन चार्ज होत आहे किंवा नाही, तसेच ती व्यक्ती प्रवास करत असल्यास नेव्हिगेशन व त्याच्या निश्चित स्थळी पोहण्याच्या वेळेचा अंदाज देखील दर्शवते.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर देशातील 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी उपलब्ध नसणार असल्याचे सांगितले आहे. तसेच हे फिचर Google Workspace, व Google Maps Go वर उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले. त्याच बरोबर गुगल मॅप्स तुमचे लाईव्ह लोकेशन इतर अ‍ॅप्सवर देखील पाठवता येणार आहे. याशिवाय हे बंद केल्यास शेवटी कोणत्या ठिकाणी डिव्हाईस बंद झाले याची माहिती देखील यामध्ये पाहता येणार आहे.

कसे वापरायचे हे नवे फिचर

1. लाईव्ह लोकेशन शेअर करण्याकरीता, तुमच्या फोनवरील Google Maps उघडा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

2. त्यानंतर, लोकेशन शेअरिंग या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रिनवरील शेअर लोकेशन वर क्लिक करा.

3. पुढे, हे फिचर किती काळा करीता शेअर करायचे आहे, याचा ऑप्शन उपलब्ध होईल. त्याचबरोबर हे लोकेशन कुणासोबत शेअर करायचे आहे याचा देखील पर्याय उपलब्ध होईल.

4. शेअर केलेले लोकेशन बंद करायचे असल्यास, Maps उघडा, Sharing through link option वर क्लिक करा आणि STOP वर क्लिक केल्यावर हे फिचर बंद करता येईल.