जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

ऐश्वर्याने पत्रकाराची केली बोलती बंद

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘द पिंक पैंथर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी एका परदेशी पत्रकाराने ऐश्वर्याला ‘तू चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन करण्यास कंफर्टेबल का नाही?’ असा प्रश्न विचारला. पत्रकाराच्या प्रश्नावर ऐश्वर्या रायने जे उत्तर दिले त्यानंतर प्रश्न विचारणाऱया पत्रकाराची बोलतीच बंद झाली.

3 हिंदुस्थानी महिला अमेरिकेत ठार

दक्षिण अमेरिकेतील दक्षिण केरोलिनाच्या ग्रीनविले काऊंटी येथे एक भीषण अपघात घडला. या अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची ओळख पटली असून रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल अशी त्यांची नावे आहेत.

बायडेन म्हणतात, ट्रम्पसोबत डिबेट करायला तयार!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डिबेट करायला मी तयार आहे, असे आव्हान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रिपब्लिकनचे संभावित उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना दिले. ट्रम्प यांनीही हे आव्हान स्वीकारले असून तेही म्हणाले की, मीही तयार आहे. एक्सएम रेडिओ होस्ट हॉवर्ड स्टर्न यांनी बायडेन यांना प्रश्न विचारला की, ते डिबेट करायला तयार आहेत का? त्या वेळी बायडेन म्हणाले, हो, निश्चित तयार आहे, असे ते म्हणाले.