रेवण्णा म्हणतो, लवकरच हजर होतो…

सेक्स स्पँडल प्रकरणाने अडचणीत आल्यावर गुपचूप देशाबाहेर निघून गेलेले जद(एस) आणि भाजप युतीचे उमेदवार व देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांनी मी लवकरच परतणार असून चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर होईन, असे एक्सवर म्हटले आहे. रेवण्णा हसन मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. लैंगिक अत्याचार आणि पाठलाग आरोपांखाली प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्णांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंबंधी समन्स बजावण्यात आले आहे. सत्य लवकरच सगळ्यांना समजेल. माझ्या वकिलामार्फत सीआयडीशी संपर्कही साधला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.