मोदी ईडीला म्हणतील, देवाच्या आदेशाप्रमाणे मी केले; राहुल गांधींचा जबरदस्त टोला

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला. बिहारच्या बख्तियारपूर येथे एका प्रचारसभेत ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एक परमात्मा सिद्धांत मांडला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की ही परमात्मावाली गोष्ट का तयार करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर जेव्हा ईडीचे लोक नरेंद्र मोदींना अदानीविषयी विचारतील, तेव्हा मोदी म्हणतील की त्यांना काहीही ठाऊक नाही, परमात्म्याने त्यांना सांगितलं. मोदी तुम्ही लांबलचक भाषणं देणं बंद करा. देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.