अशोक गहलोत यांची तब्येत बिघडली, कोरोनासह स्वाईन फ्लूचीही झाली लागण

देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वसामान्य लोकांसह सेलिब्रिटी, राजकीय नेते मंडळी हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत (वय – 72) कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. कोविडसह त्यांना स्वाईन प्लू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अशोक गहलोत यांना एकाचवेळी कोरोना आणि स्वाईन फ्लूची लागल झाली आहे. डॉक्टरांच्या निर्देशानुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील सात दिवसांमध्ये होणारे सर्व राजकीय, कौटुंबीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही माहिती दिली.

“गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी केली असता मला कोरोना आणि स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील 7 दिवस मी कोणाचीही भेट घेऊ शकणार नाही. या बदल्या हवामानात आपण सर्वांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे”, असे ट्विट अशोक गहलोत यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर केले आहे.