देशातील जनता भाजपचा दारुण पराभव करणार; अखिलेश यादव यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट होत आहेत. बिहारमधील पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर आता बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजपला रोखण्यासाठी एकडूट करण्यात येत आहे. कॉंग्रेससह 24 पक्षांचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीआधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आगामी निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करणारच असा विश्वासही व्यक्त केला आहे.

कॉपी करणारे कधीच पास होत नाहीत, असा टोलाही अखिलेश यांनी लगावला आहे. पाटणा नंतर बंगळुरू येथे बैठक होत आहे याचा मला आनंद आहे. देशातील दोन तृतीयांश जनता भाजपाला पराभूत करणार असून, मला आशा आहे की जनता भाजपचा दारुण पराभव करेल. मी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करेन कारण त्यांनी भाजपाला पराभूत केले. मला सर्व कानाकोपऱ्यातून माहिती मिळत आहेत. देशातून भाजपाचा नायनाट होईल. जे लोक कॉपी करतात त्यांना कधीच यश मिळत नाही. विरोधकांची बैठक होत आहे अशी माहिती मिळताच त्यांनी आपलीही बैठक बोलावली आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली.