कणभर तीळ…

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

छोटय़ाशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र ठासून भरलेली आहे. आधुनिक आहार शास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचे महत्त्व आपल्या आहारात काय आहे ते पाहू यात.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीने खात आलो आहोत. तीळ आणि गूळ, बाजरी हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसात एपंदर थंडी खूप असते. त्यामुळेच शरीराला उष्णता मिळावी यासाठी कदाचित ते पूर्वापार आपल्या आहारात या दिवसांत जास्त प्रमाणात घ्यायला सांगितले असावेत. अगदी पुरातन काळापासून न्यात असलेल्या अशा या तेल बिया!! अनेक हजारो वर्षे आपण तीळ आणि तिळाचे तेल वापरत आलेलो आहोत.

मजबूत हाडांसाठी…
तिळात पॅल्शियम तसचे इतरही अनेक महत्त्वाचे असे क्षार आहेत जसे की मँगनीज, लोह, फॉस्फरस आणि सेलेनियम ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ!. तिळात झिंक जास्त असते, जे परत हाडांची ठिसूळता कमी होण्यापासून मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. ज्यांना पॅल्शियमची कमतरता आहे किंवा मॅनोपॉजमुळे हाडांची ठिसूळता वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यांच्यासाठी तीळ हे फार महत्त्वाचे आहेत.

सुरकुत्या कमी करतात…
काळे तीळ आहारात आपण जास्त वापरत नाही. परंतु पॉलिश न केलेल्या तिळात पॅल्शियमच नव्हे तर इतर अनेक पोषक घटक जास्त असतात. तसेच त्यात अॅण्टी ऑक्सिडंट्सदेखील जास्त असतात.
अॅण्टी ऑक्सिडंटस आपल्याला फ्री रेडीकल्सपासून वाचवतात आणि वय वाढत असताना जे बदल आपल्या चेहऱयावर किंवा शरीरावर सुरकुत्याच्या रूपात दिसतात त्यांचा परिणाम कमी करतात. म्हणूनच कदाचित फार पूर्वी तीळ आणि तिळाचे तेल चिरतारुण्यासाठी वापरत असावेत.

कोलेस्टेरॉल कमी करताना…
यात फायटोस्टीरोल्स नावाचे घटक असतात जे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरोल कमी करू शकतात आणि कर्करोगापासून आपले संरक्षण करतात.

तीळ आणि भूक
तिळात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थामुळे भूक कमी लागते. कारण त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. तुमच्या वेट लॉसच्या आहारात तुम्ही तिळाचा समावेश करू शकता. एक चमचा तीळ खाल्ले की त्यात साधारण 50 उष्मांक मिळतात. त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. परंतु त्यात जसे तेल आणि प्रथिन जास्त आहे तसेच तंतुमय पदार्थदेखील जास्त आहेत हे चांगले आहे.

तेल आणि स्वयंपाक
तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायलादेखील चांगले आहे, त्यात मोनो आणि पॉली अन् सच्युरेटेड फॅट्स आहेत. या तेलात काही विशेष असे घटक सापडतात ते म्हणजे सीसमोल आणि सिसमीन जे अतिशय उत्तम असे अॅण्टी ऑक्सिडंट्स आहेत यासाठीच तसेच यात ओलिक ऑसिड असते जे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरोल कमी करायला मदत करते .

संधिवातावर मात
तिळात लोह आणि कॉपर असते. कॉपर शरीरातील लोहाच्या अभिशोषणास मदत करते. त्यात असलेले कॉपर संधिवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. अशा प्रकारच्या गुणधर्मामुळेच तिळाचे तेल लावून मसाज केल्याने संधिवाताच्या रुग्णांना बरे वाटत असावे.

वजन कमी करा पोषण नाही
वजन कमी करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्त्वे कमी पडू न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे थोडे तीळ जर रोजच्या आहारात घेतले तर त्यामुळे फायदाच होईल तंतुमय पदार्थामुळे कोठा साफ राहील तसेच याचा फायदा मधुमेही, कोलेस्टेरोल कमी करणे यासाठी होऊ शकतो .

तिळाचे महत्त्व केवळ पदार्थाची चव, रंगरूप वाढवण्यासाठी मर्यादित नसून त्याचा वापर पोषणमूल्यासाठी म्हणून करणे आवश्यक आहे. चटणी करणे, तिळाचा समावेश थालीपीठासारख्या पदार्थात करणे किंवा तीळ सकाळी चावून खाणे असा तिळाचा समावेश आपल्या रोजच्या आहारात अवश्य करावा. साधारण एक ते दोन चमचे तीळ रोज घ्यायला हरकत नाही. काही कृत्रिम गोळय़ा आणि व्हिटॅमिन्स घेतो. त्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या पारंपरिक अशा पदार्थांचा आपण जर आहारात समावेश केला तर…