
गेली अनेक वर्षे शिवसेना शाखा क्र. २०६ च्या वतीने माजी शाखाप्रमुख निवांत घेरडे चौक, शिवडी नाका येथे ‘कट्टर निष्ठावंतांची दहीहंडी’ चे आयोजन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात येते. दरवर्षी मुंबईतील शंभर-सव्वाशेहून अधिक गोविंदा पथके येथे येऊन सलामी देतात. सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला शाखेच्या वतीने रोख रक्कम आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येते. “निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर भविष्यातही हा उत्सव असाच सुरू राहील,” अशी माहिती पुणे संपर्कप्रमुख, नगरसेवक सचिन पडवळ आणि शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांनी दिली.





























































