इंधन दरवाढ रद्द करा, महागाई रोखा; शिवसेनेचा विक्रोळीत ‘जन आक्रोश’ मोर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरमसाठ वाढलेली इंधन दरवाढ आणि महागाईमुळे भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ‘इंधन दरवाढ रद्द करा आणि महागाई रोखा’ अशी जोरदार मागणी करीत आज विक्रोळीत शिवसेनेने भव्य ‘जन आक्रोश’ मोर्चा काढला. शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी विधानसभा शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

जोपर्यंत महागाई कमी होणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून शिवसेना जनआंदोलन करत राहील, असा इशाराही सुनील राऊत यांनी यावेळी दिला. यावेळी माजी आमदार रमेश कोरगावकर, विभाग संघटक रश्मी पहुडकर, परम यादव, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, सुनीता जाधव आणि श्वेता पावसकर आदी उपस्थित होते.