शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांची आज कार्यशाळा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची एकदिवसीय कार्यशाळा उद्या शनिवारी सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार, प्रवक्ते, विभागीय समन्वयक, संघटक, पुरुष आणि महिला जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, पुरुष आणि महिला जिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक, जिल्हा संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सडेतोड वत्ते, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) आणि युवासेना जिल्हा विस्तारक, पुरुष आणि महिला युवासेना जिल्हा युवा अधिकारी आदी पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आली.

कार्यशाळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, धनंजय देशमुख हेदेखील कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.