तुमसर रेल्वे टाऊनजवळ घडली धक्कादायक घटना; एका व्यक्तीचा मृतदेह आढळला

>> सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर रेल्वे टाऊन जवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृत व्यक्तीचं नाव जियालाल रहांगडाले (रा. रनेरा) अशी माहिती मिळते आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर शहरातील रेल्वे टाऊनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळला. नागरिकांनी याबाबतची माहिती तुमसर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौकशी केली. पुढील तपासणीसाठी मृतदेह पाठवून देण्यात आला. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मृत जियालाल याला दारूचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली.

मृत व्यक्ती हा मद्यधुंद अवस्थेत होता त्याने काहीही खाल्ले नव्हते. अति मद्यप्राशन आणि उपाशीपोटी अवस्थेत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. घटनेची नोंद तुमसर पोलीस ठाण्यात केली आहे.