
महायुतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची जुमलेबाजी निवडणुकीपुरती केली, मात्र प्रत्यक्षात बळीराजाची अवस्था दयनीय आहे. त्याचे भीषण वास्तव लातूरमध्ये दिसले. देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द गावातल्या काशीनाथ गायकवाड यांच्याकडील बैलजोडीपैकी एक बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर पत्नी औसाबाईला त्यांनी नांगराला जुंपले आणि नांगरणी केली. मन हेलावून टाकणारा असा हा प्रसंग असून ‘संवेदनाहीन सरकारलाच नांगराला जुंपा’, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.




























































