World Cup 2023 – ‘मला पण खेळायचं’, म्हणत मैदानात घुसला चाहता, विराट कोहलीने काढली समजूत

चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात हिंदुस्थानचा सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि हिंदुस्थानचा संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याचवेळी जार्वोने हिंदुस्थानी जर्सीमध्ये मैदानात धाव घेतली आणि मलाही खेळायचा असा हट्ट धरला. जार्वो मैदानात आल्याने खेळाडूंचे लक्ष विचलीत झाले. त्याच्या पाठोपाठ सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली जार्वो पुढे आणि सुरक्षा रक्षक पुढे असे दृश्य थोडावेळ दिसले. मात्र विराट कोहली याने सुरक्षा रक्षकांसोबत जार्वोची समजूत काढली आणि त्याला परत पाठवले आणि त्यानंतर सामाना सुरु झाला.

ट्विटरवर डॅनिअल जार्विस या नावाने प्रसिद्ध असलेलाा जार्वो हा विनोदी अभिनेता आणि सिनेनिर्माता आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा उल्लेख आहे. bmwjarvo या नावाने त्याचे युट्युब चॅनलही आहे.

2021 मध्ये हिंदुस्थान संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील दुसऱ्या लढती दरम्यान जार्वो हिंदुस्थानची जर्सी घालून मैदानात आला होता. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर आणखी एका सामन्यात पॅड, हेल्मेट आणि ग्लोज घालून तो मैदानात उतरला होता. त्याच्या जर्सीवर 69 हा नंबर लिहीला होता. वारंवार मैदानात घुसून व्यत्यय आणणाऱ्या जार्वोवर मेदानात येण्यास बंदी घालण्यात आली होती.